आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुद्देमाल जप्त:एएसपी कुमावत यांच्या‎ पथकाचा छापा; जुगार‎ खेळणारे 20 जेरबंद‎

केज‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केजचे सहायक पोलिस अधीक्षक‎ पंकज कुमावत यांच्या पथकाने‎ रविवारी रात्री ९.१५ च्या सुमारास बीड‎ शहरातील क्लासिक हॉटेलवर छापा‎ मारून तिर्रट खेळणाऱ्या २० जणांना‎ रंगेहाथ पकडले.‎ त्यांच्याकडून नगदी १ लाख १३ हजार‎ ४५० रुपये व ६८ हजार रुपयांचे‎ मोबाईल असा १ लाख ८१ हजार ४५०‎ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बीड‎ शहरातील क्लासिक हॉटेलमध्ये‎ प्रवीण राजेंद्र पालवणकर हा लोकांना‎ एकत्र बसवून तिर्रट नावाचा जुगार‎ खेळवत असल्याची माहिती‎ कुमावत यांना मिळाली. रविवारी‎ रात्री केज ठाण्याचे फौजदार राजेश‎ पाटील यांच्यासह पथकाने हा छापा‎ टाकला.‎

बातम्या आणखी आहेत...