आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात मिळाला प्रतिसाद:धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रॅलीने शहरवासीयांचे वेधले लक्ष ; नागरिकांचा होता सहभाग

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड शहरात बुधवारी ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. शेकडो दुचाकींसह नागरिकांनी यात सहभाग घेतला.मोटारसायकल रॅलीची सुरुवात बशीरगंज चौकातून सुरू होऊन ती पुढे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळा, सावित्रीबाई फुले आणि मा. जोतिबा फुले, अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा या मार्गाने या महापुरुषांना अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या रॅलीचा समारोप करण्यात आला.

या वेळी बोलताना पप्पू कागदे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे चक्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गतिमान करत धम्मचक्र प्रवर्तन केले. तेव्हापासून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो.

या वेळी राजाभाऊ जोगदंड, किशन तांगडे, महेश आठवले, बापू पवार, अविनाश जोगदंड, विलास जोगदंड, सुभाष तांगडे, भय्यासाहेब मस्के, प्रभाकर चांदणे, प्रा. बाळासाहेब गव्हाणे, महेंद्र वडमारे, आनंद सरपते, मनोज वाघमारे, सचिन वडमारे, भाऊसाहेब दळवी, बप्पा जावळे, श्रीकांत साबळे, मिलिंद पोटभरे, प्रा. अण्णासाहेब सोनवणे, नागेश शिंदे, डॉ. अक्षय कांबळे, पप्पू वाघमारे, दीपक अरुण, डॉ. धम्मा पार्वेकर, भय्या साळवे, श्याम वीर, गणेश वाघमारे, कपिल इनकर, विशाल मिसळे, सनी जोगदंड, आदित्य जोगदंड, अप्पा पवार, मनोज भडगळे, विशाल साबळे, आकाश साबळे, गौतम कांबळे, विजय डोळस, महेश कागदे, अशोक मस्के, नवनाथ डोळस, राजाभाऊ वक्ते, राहुल कांबळे, नितीन वाघमारे, विशाल गव्हाणे, अनिकेत कांबळे, सोनू वडमारे, बिभीषण जावळे, राहुल मगर, बबलू जोगदंड, नितीन शिंदे, मनोज वक्ते, भीमराव घोडेराव आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

घोषणांनी दणाणला परिसर
दरम्यान, रॅलीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत सहभागी सर्व दुचाकीस्वारांनी ‘जय भीम, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, गौतम बुद्धांचा विजय असो’ अशा प्रकारच्या घोषणाच्या दिल्या. यामुळे रॅलीचा संपूर्ण मार्ग घोषणांनी दणाणला होता. मोठ्या संख्येने हातात निळे झेंडे घेऊन नागरिकांनी यात सहभाग नोंदवला होता.

बातम्या आणखी आहेत...