आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गुहेतून वैष्णाेदेवीच्या प्रतिकृतीचे हाेणार दर्शन

रवी उबाळे |बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या बीडचा राजा न्यू गणेश मित्रमंडळाने आपली वेगळी आेखळ निर्माण केली आहे. यंदाही गणेश उत्सवात या मंडळाच्या वतीने सिंहाचे प्रवेशद्वार असलेल्या शंभर फूट लांब गुहेतून वैष्णाेदेवी प्रतिकृती दर्शनाचा देखावा साकारला जात आहे, ३ सप्टेंबरपासून हा देखावा खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे मार्गदर्शक गिरीश गिलडा यांनी दिली.

गिलडा पुढे म्हणाले की, बीडचा राजा न्यू गणेश मित्रमंडळाची स्थापना १९५४ मध्ये झाली आहे. यंदा मंडळाचे हे ६८ वे वर्ष आहे. मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. यंदाही मंडळाने सिंहाचे प्रवेशद्वार असलेल्या शंभर फूट लांब गुहेतून वैष्णाेदेवी प्रतिकृतीचे दर्शन या देखाव्याची तयारी सुरू आहे. दाेन वर्षांपूर्वी बर्फानी बाबा अमरनाथ दर्शन देखावा पाहण्यासाठी दीड किलोमीटर लांब रांगा हाेत्या. मंडळाने हा देखावा भाविकांसाठी माेफत ठेवला हाेता. मंडळाचे अध्यक्ष म्हणून प्रीतम गिलडा यांच्यावर जबाबदारी आहे, तर उपाध्यक्ष व्यंकटेश दाेडे, सचिव सतीश पगारिया, कार्याध्यक्ष विशाल शर्मा, कोषाध्यक्ष कृष्णा मुंदडा तर मार्गदर्शक म्हणून नरेश मुंदडा, संताेष पगारिया, प्रगेश कुलकर्णी यांचा मंडळात समावेश आहे.

मंडळाच्या उपक्रमांना सकारात्मक प्रतिसाद
बीडच्या राजा न्यू गणेश मित्रमंडळाची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळची आहे. आजपर्यंत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारलेली सामाजिक जबाबदारी आणि भाविकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद हेच मंडळाचे यश आहे. यातूनच मंडळ पदाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम राबवले जातात.
-गिरीश गिलडा, मार्गदर्शक, बीडचा राजा न्यू गणेश मित्रमंडळ.

बातम्या आणखी आहेत...