आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरळी शहरातील सर्वात जुनी शाळा वैद्यनाथ विद्यालयाची ओळख असलेल्या शाळेच्या १९९७ बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन महाराष्ट्र दिनी पार पडला. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या ध्वजवंदनास सर्व माजी विद्यार्थी उपस्थित राहिले.
या कार्यक्रमास माजी शिक्षकांनाही निमंत्रिकत केले गेले होते. यावेळी, दत्ताप्पा इटके, पी.एस.घाडगे, यांच्यासह इतर माजी शिक्षक व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थित गुरूजनांचा शाल, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ, वैद्यनाथाची प्रतिमा भेट देवून विद्यार्थ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ताप्पा ईटके म्हणाले की,१९९७ च्या बॅचचे विद्यार्थी आमच्या हातून घडले ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. हे विद्यार्थी एकत्र येवून राबवत असलेले विविध उपक्रम कौतुकास्पद आहेत. या माजी विद्यार्थ्यांनी अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केलेली आहे. मयत सहकारी मित्राच्या कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे हे ही त्यांनी आवर्जून सांगितले. प्रास्ताविक अविनाश कापसे यांनी केले.
त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांचाही गुरूजनांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करत शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळेत घडलेले प्रसंग सांगितले, आठवणी सांगितल्या, हा स्नेहमिलन सोहळा अविस्मरणीय असल्याचेही अनेक विद्यार्थी, विद्यार्थीनींनी सांगितले. सुत्रसंचालन डॉ.रविंद्र ईटके, सारीका गायकवाड यांनी केले. शेवटी संदीप जाधव याने आभार प्रदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
वैद्यनाथ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, माजी शिक्षक आले एकत्र; मदतीचा हात पुढे १९९७ बॅचच्या विद्यार्थ्यांनी मृत माजी विद्यार्थी किशोर स्वामी याच्या मुलीच्या नावे १ लाखाची एफडी करून दिलेली आहे. तसेच शेषेराव लोखंडे याच्या मुलीच्या विवाहासाठी मदत म्हणून केली आहे. यापुढेही अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्याचा संकल्पही करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.