आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंगलीचा‎ कार्यक्रम आयोजित:कांदेवाडीमध्ये रंगली कुस्त्यांची दंगल‎

दिंद्रूड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिंद्रूड‎ संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त‎ व नवीन वर्षानिमित्त कांदेवाडी येथे‎ रविवारी जंगी कुस्त्यांच्या दंगलीचा‎ कार्यक्रम आयोजित केला होता. या ‎कुस्त्यांसाठी जिल्ह्याबाहेरीलही ख्यातनाम ‎पहिलवानांनी उपस्थित राहून सहभाग‎ घेतला.‎ धारूर तालुक्यातील कांदेवाडी येथे‎ गेल्या सात वर्षापासून श्री. संत‎ भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त व‎ नवीन वर्षानिमित्त १ जानेवारी रोजी भव्य‎ जंगी कुस्ती दंगलीचे आयोजन करण्यात‎ येते. रविवारीही भव्य जंगी कुस्त्यांच्या‎ दंगलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात‎ आला होता.

सकाळी ११ वाजता जि.प.प्रा.‎ शाळेसमोरील प्रांगणात या कुस्त्यांच्या‎ दंगलीस मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ‎ करण्यात आला. या कुस्त्यात विजेत्या‎ पहिलवानास १०० रुपयांपासून ११ हजार‎ रुपयांपर्यंत पर्यंत रोख स्वरूपात बक्षीस‎ देण्यात आले. पंचक्रोशीतील शेकडो‎ कुस्तीप्रेमींनी कुस्त्यांचा आनंद घेण्यासाठी‎ हजेरी लावली होती.‎

मराठवाड्यातील व दिंद्रूड परिसरातील‎ अनेक नामवंत पहेलवानांनी कुस्त्यांचा फड‎‎ ‎चांगलाच रंगवला. प्रेक्षकांनी देखील या‎ कुस्त्यांना चांगलीच दाद दिली. कांदेवाडी‎ येथील कुस्ती कमिटीचे अध्यक्ष परशुराम‎ कांदे,विष्णू खाडे, पोलीस गणेश खाडे,‎ नवनाथ लटपटे, माऊली खाडे, अशोक‎ खाडे, अशोक कांदे, पप्पू कांदे, गोपीचंद‎ कांदे, सोमनाथ लटपटे, आबासाहेब कांदे‎ आदी गावकऱ्यांनी आयोजन केले होते.‎

बातम्या आणखी आहेत...