आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्युत पुरवठा:धारूर तालुक्यात शॉक लागून सोशल मीडिया स्टारसह एकाचा झाला मृत्यू

धारूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गावासाठी विद्युत पुरवठा करणाऱ्या डीपीचा शॉक लागून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास भोगलवाडी येथे घडली. यातील संतोष मुंडे हा सोशल मीडियावरील स्टार हाेता. धारूर तालुक्यातील भोगलवाडी गावासाठी विद्युत पुरवठा करण्यात येणारी सिंगल फेज डीपी गावाच्या उत्तरेस आहे. या गावचा विद्युत पुरवठा सतत खंडित होतो. येथे असलेले लाइनमन राठोड हे औरंगाबाद येथे ट्रेनिंगसाठी गेलेले होते. यामुळे येथे सतत विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडत होता. मंगळवारी सायंकाळी ढगाळ वातावरण सुरू होते. यातच संतोष मुंडे आणि बाबुराव मुंडे या दोन तरुणाचा डीपी जवळ शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी उघडकीस अाली.

बाबुराव मुंडे यांना प्रथम शॉक लागला असता त्याला वाचवण्यासाठी संतोष मुंडे यांनी प्रयत्न करीत असताना संतोषलाही शॉक लागला ही बाब ग्रामस्थांना कळल्यानंतर या दोघांना तेलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. संतोष मुंडे आणि बाबुराव मुंडे हे चुलते पुतणे होते. त्या ठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...