आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीच्या वाटणीवरून सैनिक मुलाने वृद्ध पालकास डांबले:शिवीगाळ करत मारहाणही केली; देवगावच्या घटनेत मुलाविरोधात गुन्हा

केज15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेताची वाटणी करून का देत नाहीत असे म्हणत दारूच्या नशेत तर्र होऊन आलेल्या सैन्यात नोकरीस असलेल्या मुलाने वयोवृद्ध माता-पित्यास शिवीगाळ व लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करीत घरात रात्रभर डांबून ठेवल्याची घटना देवगाव (ता. केज) येथे घडली. याप्रकरणी मुलाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवगाव (ता. केज) येथील शेतकरी सौदागर रामराव मुंडे (७०) यांना दोन मुले असून त्यांचा थोरला मुलगा उत्तरेश्वर हा सैन्य दलात नोकरीस असून धाकटा मुलगा पांडुरंग हा शेती करतो. सैनिक असलेला उत्तरेश्वर हा मागील २० दिवसांपूर्वी सुट्टीवर आलेला आहे. वयोवृद्ध मुंडे दाम्पत्य १७ नोव्हेंबर रोजी रात्री जेवण करून झोपण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात त्यांचा सैनिक मुलगा उत्तरेश्वर सौदागर मुंडे हा दारूच्या नशेत तर्र होऊन घरी आला. त्याने घरात येऊन गोंधळ घालत वृद्ध आईवडिलांना तुम्ही घरात राहयचे नाही, निघा बाहेर असे म्हणत तुम्ही शेताची वाटणी का करू देत नाहीत अशी कुरापत काढून वयोवृद्ध माता-पित्यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली.

तुम्ही शेती वाटून दिली नाही, तर जीवे मारून टाकीन अशी धमकी देऊन भाऊ सुट्टीवर आल्यास त्रास देतो, त्याच्यापासून माझ्या व पत्नीच्या जीवितास धोका आहे. असे म्हणत सैनिक उत्तरेश्वर मुंडे याने वयोवृद्ध आईवडिलांना रात्रभर घरात डांबून ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता ही माहिती त्यांची मुलगी उषा मुंडे हिला समजल्यावर तिने त्यांची सुटका केली. त्यानंतर वडील सौदागर मुंडे थेट पोलिस ठाणे गाठले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून उत्तरेश्वर मुंडे या सैनिक मुलाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास नांदूरघाट चौकीचे जमादार अभिमान भालेराव हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...