आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील गजानननगर भागातील सर्व्हे नंबर ३८० मधील नगर परिषदेच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या ओपन स्पेसवर बोगस कागदपत्राधारे ताबा घेण्याच्या उद्देशाने रात्रीतून मंदिर बांधून जागा हडपण्याचा डाव समोर आला आहे. याप्रकरणी नागरिकांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
शहरातील गजानननगर भागात आ.प्रकाश सोळंके यांच्या निवासस्थानासमोर नगर परिषदेची स.न.३८० मधील जवळपास २०० बाय २०० ओपन स्पेस आहे. शासकीय विकास आराखडा व अभिन्यासात याचा उल्लेख आहे. ही जागा हडपण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे करून खरेदी विक्री व नगर परिषदेला नावे लावण्यात आली व त्यावरून काही लोकांनी कोट्यावधी रुपयांच्या ओपन स्पेसचा ताबा घेण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र, तत्कालीन नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी ते प्रयत्न हाणून पाडले होते. आता धार्मिक भावनेच्या आडून जागा ताब्यात घेण्याच्या उद्देशाने रात्रीतून चौथारा बांधला व त्यावर मंदिर असल्याचा दिखावा केला.
रहिवाशांनी हे अतिक्रमण हटवावे व ही जागा क्रीडांगण अथवा उद्यानासाठी यासाठी वापरावी अशी मागणी केली आहे. या अतिक्रमणाची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीवर अमरनाथ खुर्पे, प्रा.गणेश सोळंके, अरविंद तिडके, महारुद्र चोपडे, अक्षय प्रधान, विश्वंभर सोळंके, गणेश काशिद, देवेंद्र सोळंके, चंद्रशेखर तौर, भगवान शेजुळ, शंतनु सोळंके, राजाभाऊ सोळंके, सुखदेव होके, रमेश जाधव, शहाजी सोळंके, प्रकाश वाकणकर, रामराजे सोळंके, ज्ञानोबा शिंदे, अशोक बादाडे, मदनराव शेजुळ,सुधाकर प्रधान, संदीपान बोबडे, प्रणित होके आदींच्या आदींच्या सह्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.