आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅक्टर उलटला:केज-कळंब रस्त्यावर उसाने भरलेला ट्रॅक्टर उलटला; ट्रॅक्टर एकमेकांना ओव्हरटेक करत असताना ट्रॉलीसह उलटले

केज4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऊस घेऊन चाललेले दोन ट्रॅक्टर एकमेकांना ओव्हरटेक करत असताना एका ट्रॉलीतील ऊस दुसऱ्या ट्रॅक्टरच्या हेडवर पडल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह उलटले, तर दुसऱ्या ट्रॅक्टरला दुचाकी धडकली. केज-कळंब रस्त्यावर घडलेल्या तिहेरी अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

केज-कळंब रस्त्याने ३ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास नवनाथ नारायण तांदळे यांच्या शेतातून तोडलेला ऊस दोन ट्रॉलीमध्ये भरून ट्रॅक्टर (एमएच ४४ एस ८३५३) हे केजमार्गे शंभू महादेव कारखान्यावर जात असताना पाठीमागून आलेल्या दुसऱ्या ट्रॅक्टरचा (एमएच ४४ डी २०१७ ) चालक नितीन रामधन मुंडे याने ट्रॅक्टर निष्काळजीपणे चालवले. त्यामुळे त्याची पाठीमागील उसाने भरलेली ट्रॉली उलटली. तर दुचाकी चालक किरकोळ जखमी झाला.

बातम्या आणखी आहेत...