आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दागिने लंपास:गोंधळ घालून प्रवासी महिलेचे दागिने लंपास

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बसमध्ये प्रवास करताना गोंधळ निर्माण करुन तीन ते चार महिलांनी प्रवासी महिलेच्या गळ्यातील दागिने लंपास केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर फाट्यावर घडली. या प्रकरणी बर्दापूर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भारत बाई दिनकर गंगणे (६५, रा. अंबाजोगाई) असे महिलेचे नाव आहे. त्या बसमधून प्रवास करत असताना बर्दापूर फाट्याजवळ तीन ते चार अनोळखी महिलांनी गोंधळ करुन त्यांचे लक्ष विचलित केले. यानंतर त्यांच्या गळ्यातील १ तोळ्याची बोरमाळ, २५ ग्रॅमचे नेकलस, १५ ग्रॅमचे झुबे, ४ आणि ३ ग्रॅमच्या दोन अंगठ्या आणि ७ हजार रुपये रोकड असा ऐवज लंपास केला.

बातम्या आणखी आहेत...