आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीडजवळ भीषण अपघात:भरधाव ट्रकने ॲपे रिक्षाला चिरडले; एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अपघातानंतर आठ किलाेमीटरवर जाऊन ट्रक उलटला; सात जण गंभीर जखमी

भरधाव ट्रकने ॲपे रिक्षाला धडक देऊन पळ काढला. आठ किमी अंतरावर जाऊन ट्रक एका तलावाजवळ उलटला. या अपघातात अॅपेतील पाच जण ठार झाले असून सात ते आठ जण जखमी झाले. रविवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान पांगर बावडी परिसरात हा भीषण अपघात झाला.

बीड शहराजवळील तेलगाव रोडवरील पांगर बावडी परिसरात वडवणीहून बीडकडे येणाऱ्या अॅपे रिक्षाला बीडहून वडवणीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने समोरासमोर धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की रिक्षा रस्त्याच्या कडेला गेला. रिक्षाचा अपघातात अक्षरशः चुराडा झाला. रिक्षात १० ते १२ जण होते. अपघाताची माहिती मिळताच आरोग्य विभागाने रुग्णवाहिका पाठवून रुग्णाना स्थलांतरित जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ
मृतांत एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे. बीड शहरातील पठाण कुटुंबावर काळाने घाला घातला. मदिना अफजल पठाण (३०), तबस्सुम अकबर पठाण (४०), रेहान अफजल पठाण (१०), तमन्ना अकबर पठाण (८), सारा सत्तार पठाण (४०) यांचा मृतांंमध्ये समावेश आहे. सर्वांचा जागीच मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...