आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलला धडकल्यामुळे दुचाकीस्वार मजूर ठार:केज तालुक्यातील होळजवळ घडली घटना

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकी रस्त्याच्या कडेच्या खड्ड्यात जाऊन पोलला धडकल्याने या अपघातात दुचाकीस्वार मजुराचा मृत्यू झाल्याची घटना केज- अंबाजोगाई रस्त्यावरील होळजवळ घडली. अपघातातील मृत मजूर हा यवतमाळ जिल्ह्यातील आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील काठी टोंबी (ता. महागाव) येथील शंकर फकिरा धोत्रे (३६) हा मजूर केज तालुक्यातील नांदूरघाट येथे रस्त्याची खडी फोडण्याच्या कामासाठी आला होता. खडी फोडण्यासाठी मजूर कमी पडू लागल्याने त्याच्या मुकादमाने गावाकडून आणखी मजूर घेऊन ये असे सांगितले. त्यामुळे गावाकडे मजूर आणण्यासाठी शंकर धोत्रे हे दुचाकीवरून (एमएच २९ बीवाय ०३८९) ४ जानेवारी रात्री निघाले होते. त्यांची दुचाकी होळ (ता. केज) येथे त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला.

बातम्या आणखी आहेत...