आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:बीडच्या तरुणीने छंदातून उभारली अनोखी बीजबँक; फेसबुकवरून दीड हजार जणांना दिल्या घरपोच बिया

बीड ( दिनेश लिंबेकर )एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • परसबागेत पन्नासपेक्षा जास्त फुलांच्या वनस्पती, विविध प्रजातींच्या अडीचशे बिया

फेसबुकवरून तुम्हाला घरपोच बिया मिळाल्या तर? त्याही देशी आणि परदेशी वाणांच्या? कधीही नावे न ऐकलेल्या? बीडच्या एका कन्येने हा चमत्कार करून दाखवला आहे. श्रुती अरुणराव ओझा असे या मुलीचे नाव आहे. २३ वर्षांच्या श्रुतीला लहानपणापासूनंच झाडे लावण्याचा छंद. तिने या छंदाला एक नाव दिले- एसव्हीएस बीज बँक. या माध्यमातून श्रुतीने फेसबुकवरून मागील दीड वर्षात १५ हजार निसर्गप्रेमी जोडलेत. यापैकी १५०० जणांना तिने पोस्टल खर्च घेत बिया घरपोच पाठवल्यात.

सध्या श्रुतीच्या परसबागेत फणस, सुपारी, वाळा, माका, भृंगराज, जांभळी, हळद, बासमती वनस्पती, कॅलालीली, मे- फ्लॉवर, अमरलीली, पिंक रेनलिली, सदाफुली अशा ५० वर फुलांच्या वनस्पती आहेत. तिच्याकडे विविध प्रजातींच्या अडीचशे बिया आहेत. एसव्हीएस बँक चालवताना श्रुतीला स्वाती कांबळी (रत्नागिरी), केतकी देवधर (मुंबई), शिल्पा तांबेकर (मुंबई), कावेरी उघाडे (औरंगाबाद), मयूरी पांडे (राजस्थान) आदींचीही मदत होते.

श्रुतीच्या एसव्हीएस बीज बँकेत राजस्थानी पोपटी काकडी, बोरासारखी मिरची

- श्रुतीकडे वालाचे पाच प्रकार आहेत. त्यात जांभळा, पांढरा, काळा, ढबू, चपटी शेंग असे प्रकार आहेत. तांदळात लाल व काळा तांदूळ.

- काकडीचे ९ प्रकार असून त्यात पांढरी, पिवळी, आंबट, राजस्थानी पोपटी काकडी, आंध्रची काकडी, धारवाड काकडी, जपानी पांढरी काकडी, आफ्रिकन काकडी आहे.

- मिरचीत लवंगी मोठी, बोरासारखी मिरची, पेरीपेरी मिरची, रसगुल्ला मिरची आहे. वाटाण्यात पांढरा, काळा, तर मुगात हिरवा, पिंपळा, वेलवर्गीय आहेत. याशिवाय श्रुतीच्या बँकेत राम, कापूर, वैजयंती, कृष्ण असे तुळशीचे नानाविध प्रकार आहेत.

- चवळीत काळी, लाल,पांढऱ्या रंगाची त्याचबरोबर देशी व बदामी चवळी आहे. याचबरोबर श्रुतीने जांभळी हळद, लाल हादगा, लाल भेंडीही जमवली आहे.

- नागालँडमध्ये वापरली जाणारी भुत झोलकिया मिरची, आसामचे लिंबू, काश्मिरी लसूण, निळी गुंज, काळा आणि पिवळा धोत्रा अशा बियांचे संकलन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...