आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐतिहासिक स्थळांना‎ भेट:गडकिल्ल्यांना भेट;‎ चिमुकले भारावले‎

केज‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केज तालुक्यातील सोनेसांगवी‎ येथील जिल्हा परिषद प्राथमिक‎ शाळा नं. २ या शाळेची शैक्षणिक‎ सहल काढण्यात आली. यावेळी‎ विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक स्थळांना‎ भेट देत माहिती जाणून घेतली. गड,‎ किल्ले पाहून चिमुकले भारावून‎ गेले.‎ सोनेसांगवी येथील जिल्हा परिषद‎ प्राथमिक शाळा नं. २ या शाळेच्या‎ वतीने शैक्षणिक वर्ष २०२२ - २३ या‎ वर्षातील सहलीचे आयोजन‎ करण्यात आले होते.

बाह्य जगाशी‎ संपर्क आणून आपल्या महाराष्ट्राचा‎ व भारताचा ऐतिहासिक ठेवा‎ विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देणे.‎ तसेच अभ्यासक्रमातील समावेशीक‎ विषयांचे प्रत्यक्ष ज्ञान व्हावे म्हणुन या‎ सहलीच्या आयोजनाचा उद्देश होता.‎ नववर्षाच्या पहिल्या दिवशी एक‎ दिवसीय सहल ही महाराष्ट्रातील‎ ऐतिहासिक असा नळदुर्ग येथील‎ भुईकोट किल्ला प तुळजापूर येथील‎ महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई‎ अंबाबाई, तेर येथील संत गोरा‎ कुंभार यांची समाधी स्थळाला भेट‎ देत दर्शन घेतले. महाराष्ट्रातील गड‎ किल्ले व संतांचा वारसा असलेली‎ संतभूमी मोठ्या उत्साहाने व‎ अभिमानाने पाहून विद्यार्थी भारावून‎ गेले. त्यांनी किल्ल्याची परिपूर्ण‎ माहिती जाणून घेतली.‎

बातम्या आणखी आहेत...