आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भांडण:साळेगाव येथे खाणावळीच्या वेटरला मारहाण ; दोघांविरुद्ध केज ठाण्यात गुन्हा दाखल

केज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिव्या देऊ नका असे म्हणाल्यावरून तिघांनी खाणावळीच्या वेटरला चापटाबुक्यांनी व लोखंडी पाईपने बेदम मारहाण करीत डोक्यात लोखंडी खुर्ची मारल्याची घटना साळेगाव (ता. केज ) येथे घडली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. साळेगाव येथील वैभव भागवत घाटुळे (२३) हा गावातील मराठा मटण खाणावळीत वेटर म्हणून कामाला आहे. ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास या खाणावळीत बसलेले तिघे जण हे शिव्या देत असताना त्यांना वैभव घाटुळे हा शिव्या देऊ नका म्हणाला. त्यावरून त्या तिघांनी शिवीगाळ करीत गच्चीला धरून चापटाबुक्याने व लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. शिवाय लोखंडी खुर्ची ही त्याच्या डोक्यात मारली. हॉटेलच्या किचनची भिंत पडून व भांडे फेकून नुकसान केले. अशी तक्रार वैभव घाटुळे याने दिल्यावरून करण गणपत घिसाडी व अनोळखी दोघांविरुद्ध केज ठाण्यात गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...