आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:लग्नासाठी अडीच लाख घेऊन पळून जाणाऱ्या मुलीसह महिलेला अटक

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नासाठी अडीच लाख रुपये घेऊन, लग्नाआधीच आत्महत्येची धमकी देत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मुलीसह अन्य एका महिलेला नातेवाईकांनी पोलिसांच्या हवाली केले. तर, या प्रकरणी एकुण सात जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.बीड शहरात ही घटना घडली. पोपट नवनाथ तळेकर (रा. घाटापिंपरी ता. आष्टी) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला लग्नासाठी एजंट नाना पाटील नुरसारे याने तुझे लग्न करुन देतो म्हणून हिंगोली जिल्ह्यातील एक मुलगी दाखवली होती मुलगी पसंद पडल्यानंतर तिच्या कुटुंबियांना अडीच लाख रुपये द्यावे लागतील म्हणून सांगण्यात आले. पोपट याने अडीच लाख रुपये दिलेही.

मुलगी पोपट यांच्या बीडमधील नातेवाईकांकडे आलेली होती. दरम्यान, मंगळवारी मुलीने आत्महत्येची धमकी देत घरी जाऊ देण्याची मागणी केली त्यानतर तिला घेण्यासाठी एक महिलाही आली. पैसे घेऊन पळून जाण्याचा प्लॅन लक्षात आल्याने पोपट व त्यांच्या नातेवाईकांनी दोघींनाही बीड शहर पोलिसंाच्या हवाली केले. या प्रकरणी एजंट नाना पाटील नुरसारे, विनोद खिल्लारे, बालाजी भालेकर, मुलगी दूर्गाची आई मनकर्णा माने, भाऊ आकाश, मुलगी दूर्गा माने, आणि मिना बळीराम बागल (सर्व रा. औंढा नागनाथ) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...