आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:लग्नाआधीच आत्महत्येची धमकी देत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मुलीसह महिलेला अटक

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नासाठी अडीच लाख रुपये घेऊन, लग्नाआधीच आत्महत्येची धमकी देत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मुलीसह अन्य एका महिलेला नातेवाईकांनी पोलिसांच्या हवाली केले. तर, या प्रकरणी एकुण सात जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बीड शहरात ही घटना घडली. पोपट नवनाथ तळेकर (रा. घाटापिंपरी ता. आष्टी) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी एजंट नाना पाटील नुरसारे, विनोद खिल्लारे, बालाजी भालेकर, मुलगी दूर्गाची आई मनकर्णा माने, भाऊ आकाश, मुलगी दूर्गा माने, आणि मिना बळीराम बागल (सर्व रा. औंढा नागनाथ) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...