आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण‎:शेतीच्या वादातून केली‎ महिलेला मारहाण‎

बीड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतीच्या वादातून महिलेला बेदम‎ मारहाण करण्यात आल्याची घटना‎ अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर‎ परळीत शनिवारी घडली.‎ इंदुबाई नवनाथ रुपनर (४५, रा.‎ ममदापूर परळी) असे मारहाण‎ झालेल्या महिलेचे नाव आहे.‎

त्यांच्या तक्रारीनुसार, शनिवारी त्या‎ शेतात असताना तुकाराम रामभाऊ‎ लवटे हे त्यांचे शेजारी रुपनर यांच्या‎ शेतातील ऊसाचे वाढे तोडून‎ आपल्या जनावरांना टाकत होते.‎ यावेळी रुपनर यांनी आमच्या‎ शेतातील वाढे तोडू नका असे‎ म्हटले. याच्या रागातून तुकाराम‎ रामभाऊ लवटे, सचिन तुकाराम‎ लवटे, परी मळा लवटे यांनी‎ शिविगाळ करुन इंदुबाई व त्यांच्या‎ कुटुंबियांना मारहाण केली.‎

बातम्या आणखी आहेत...