आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढगफुटीसदृश पाऊस:पुरात वाहून गेलेली महिला बचावली

माजलगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे माजलगाव तालुक्यातील माेगरा गावाला जाेडणारा पूल वाहून गेला. दरम्यान, पूल ओलांडताना एक मच्छीमार महिला वाहून गेली. मात्र, पाेहता येत असल्याने महिलेचे प्राण वाचू शकले.

सोनाली सखाराम बिजुले (३४) असे मच्छीमार महिलेचे नाव आहे. पूल वाहून गेल्याने काही काळ गावाचा संपर्क तुटला होता, तर गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. जोरदार पावसामुळे मोगरा गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. तसेच गावात बोअर, विहीर नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसामुळे परिसरातील खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाने गावाची पाहणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...