आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:दहिफळला महिलेचे डोके फोडले, शिंदीतील वृद्ध मारहाणीत झाले जखमी

केज9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तु भावाला व शेजाऱ्यांना का बोलतेस असे म्हणत एका महिलेचे काठीने मारून तिच्या नातेवाईकांनी डोके फोडल्याची घटना दहिफळ (वडमाऊली) येथे घडली. तर दुसऱ्या घटनेत दारातून जाण्यावरून एका शेतकऱ्यास लोखंडी हॅक्साब्लेड तोंडावर मारून जखमी केल्याची घटना शिंदी येथे घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध केज पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत दहिफळ (वडमाऊली) येथील उर्मिला नामदेव ठोंबरे (३५) या महिलेस २१ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तू भावास व शेजाऱ्यांना का बोलतेस अशी भांडणाची कुरापत काढून नामदेव अंबादास ठोंबरे याने शिवीगाळ करीत लाथाबुक्याने व काठीने बेदम मारहाण करून डोके फोडले. तर जनाबाई नामदेव ठोबरे हिने ही शिवीगाळ व लाथाबुक्याने मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली.दुसऱ्या घटनेत अमृत दादासाहेब जाधव (६५) यांना २२ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास तु आमचे दारातून जाताना बायकापोरांकडे का बघतो असे कारण काढून शिवाजी श्रीरंग जाधव याने शिवीगाळ करून हॅक्साब्लेड तोंडावर मारून जखमी केले.

चांगल्या सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न
जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठीचे प्रयत्न सतत सुरू आहेत. कधीही न झालेल्या अनेक शस्त्रक्रिया आपण जिल्हा रुग्णालयात यशस्वी केल्या आहेत. हे सर्व तज्ज्ञ व कर्मचाऱ्यांमुळे शक्य झाले आहे.
- डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड