आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:कंपनीतील कामगाराचा गुदमरून झाला मृत्यू

परळी |2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फॅक्ट्रीत सिमेंटचे नमुने घेणारा कामगार रात्री दहा वाजता ड्युटीवर गेला परंतु सकाळचे सहा वाजले तरी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. शेवटी नातेवाईक व संभाजीनगर पोलिसांनी सिमेंट फॅक्टरीत जावून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली परंतु काही हाती लागले नाही. पोलिसांनी कंपनीत फिरून शोधाशोध केली असता कंपनीत १३० फुट उंचीवर जेथे सिमेंटचे नमुने घेतले जातात त्या जागेवरील पाइपमध्ये पडून गुदमरल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याचे दुपारी एक वाजता उघडकीस आले. नारायण संभाजी फड असे मृत कामगाराचे नाव आहे. सदरील घटना शहरातील परळी ते धर्मापुरी रोडवरील द सिमेंट इंडिया लिमिटेड या कंपनीत घडली.