आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडच्या तरुणीला शिक्रापूरला बोलावून अत्याचार:दोघांचे फोटो नातेवाइकांसह मित्र-मैत्रिणींना पाठवून बदनामी, बीडमध्ये गुन्हा दाखल

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर बीडच्या तरुणीला पुण्याला बोलावून तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर अत्याचाराचा व्हिडिओ काढून नातेवाइकांना पाठवत बदनामी करेल, अशी धमकी देत ब्लॅकमेल केले. शिवाय तरुणाने दोघांचे फोटो मुलीच्या नातेवाइकांसह मित्र-मैत्रिणांना पाठवत तरुणीवर सतत अत्याचार केला. याप्रकरणी पीडित तरुणीने बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून शिक्रापूर येथील तरुणावर माहिती तंत्रज्ञान अधिनियमाप्रमाणे मंगळवारी गुन्हा दाखल झाला.

बीड शहरातील शिवाजीनगर ठाण्याच्या हद्दीतील २३ वर्षीय विद्यार्थिनीची पुण्यातील सांडस रांजणगाव येथील शेख शरीफ (जि.पुणे) या तरुणाशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. दोघे इन्स्टाग्रामसह व्हॉट्सअ‍ॅपवर बोलत होते. ओळखीनंतर त्या तरुणाने मुलीला भेटण्यासाठी पुण्याजवळील शिक्रापूर येथे बोलावले. “माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्याशीच मी लग्न करतो,’ असे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. अत्याचाराचा व्हिडिओ तयार करून तरुणीचा ई-मेल आयडी मोबाइलमधून घेऊन इन्स्टाग्राम अ‍ॅपवर तिचे खाते सुरू करत तिच्या नातेवाइकांचे मोबाइल नंबर तरुणाने स्वत:कडे कॉपी केले. यानंतर शारीरिक संबंध ठेवू दिले नाहीस तर तो व्हिडिओ तुझ्या नातेवाइकांना पाठवून तुझी बदनामी करेन, अशी धमकी देत तरुणीवर अनेक वेळा अत्याचार केले. पीडितेच्या आईलाही टेक्स्ट मेसेज करून पैशाची मागणी त्याने केली होती.

शिक्रापूर येथील ‘त्या’ तरुणावर गुन्हा शिक्रापूर येथील तरुणाने त्याच्या मोबाइल नंबरवरून तरुणीच्या नातेवाइकांसह ५० मित्र-मैत्रिणींना दोघांचे अश्लील फोटो व्हॉट्सअ‍ॅप व इन्स्टाग्राम अ‍ॅपवर पाठवून तरुणीची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून शेख शरीफ (जि.पुणे) याच्याविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक राठोड करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...