आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकस्मिक मृत्यूची नोंद:अंथरवणपिंप्रीत तरुणाची गळफास घेत आत्महत्या

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड तालुक्यातील अंथरवणपिंप्री येथे २५ वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शेषराव भिमराव कुटे (२५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी त्याने शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिस ठाण्याचे हवालदार अशोक दराडे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी भिमराव कुटे यांची माहितीवरुन पिंपळनेर ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद केली.

बातम्या आणखी आहेत...