आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या‎:बेलगावमध्ये तरूणाची‎ गळफास घेऊन आत्महत्या‎

बीड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी तालुक्यातील बेलगावमध्ये‎ तरुणाने गळफास घेत आत्महत्या‎ केल्याची घटना शनिवारी घडली.‎ मृत तरुणाच्या पत्नीचे पाच‎ महिन्यांपूर्वीच निधन झाले होते.‎ आता त्यानेही आत्महत्या केल्याने‎ दोन चिमुकले अनाथ झाले आहेत.‎ अमोल नवनाथ पोकळे‎ (३२)असे आत्महत्या केलेल्या‎ तरुणाचे नाव आहे. त्यांच्या पत्नीचे‎ पाच महिन्यांपूर्वी निधन झाले आहे.‎

दोन मुले आणि आई वडिलांसह ते‎ आष्टी तालुक्यातील बेलगावमध्ये‎ रहात होते. शुक्रवारी जेवण करुन ते‎ घरात तर आई, वडिल आणि दोन‎ मुले अंगणात झाेपले होते. शनिवारी‎ पहाटेच्या दरम्यान त्यांनी घरात‎ गळफास घेतला. शनिवारी सकाळी‎ ही बाब उघडकीस आली.‎

बातम्या आणखी आहेत...