आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:सातेफळ येथे तरुणाची गळफास घेेऊन आत्महत्या

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

३० वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरातील पत्र्याच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील सातेफळ येथे ४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. दत्तात्रय बालासाहेब बोबडे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

सातेफळ येथील शेतकरी कुटुंबातील दत्तात्रय बालासाहेब बोबडे हा तरुण अनेक वर्षांपासून नाशिकला खासगी वाहनावर चालक म्हणून काम करीत होता. एक वर्षापासून गावी राहत होता. रविवारी (दि.४) रात्री त्याची आई व पत्नी या बाहेर गेल्या होत्या. त्यानंतर १० वाजेच्या सुमारास त्याने घराची आतून कडी लावून लाकडी आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. याच वेळी घरी आलेल्या आई व पत्नीने घराची आतून लावलेली कडी पाहून शेजारच्या मदतीने दरवाजा उघडून त्याला उपचारासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. सोमवारी शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याने आत्महत्या का केली? याचे कारण स्पष्ट झाले नव्हते. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी आहेत. युसूफवडगाव पोलिस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.

बातम्या आणखी आहेत...