आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:युवकाला कत्तीने मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

किरकोळ कारणावरुन युवकाला काठी, रॉड आणि कत्तीने मारहाण करुन जखमी केल्याची घटना बीड शहरातील पेठ बीड भागात घडली. या प्रकरणी पाच जणांविरोधात पेठ बीड पोलिसंात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

निखील गणेश रांजवण (१९, रा. शाहूनगर, बीड) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. आकाश जाधव यांच्या राशन दुकानासमोर उभा असताना किरकोळ कारणावरुन संजय घाेडसे, राम बाबुराव घोडसे, निखील राम दैठणकर (सर्व रा. खडकपूरा ) यांनी त्याला रॉड आणि कत्तीने मारहाण केली यात तो जखमी झाला.

बातम्या आणखी आहेत...