आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरीं:स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा-निमित्त गौरींसमोर आरास

धारूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त धारूर शहरात चिद्रवार कुटूंबियांनी महालक्ष्मीनिमित्त तिरंगा आरास बनवत अनोख्या पध्दतीने उत्सव साजरा केला. स्वातंत्र्याच्या ७५ वा अमृत महोत्सव यावर्षी साजरा होत आहो. धारूर शहरात महालक्ष्मी सणाला हर घर तिरंगा हा संदेश सर्वत्र जावा, या उद्देशाने चिद्रवार कुटुंबीयांनी घरामध्ये आकर्षक आरास बनवली आहे.

तीन रंगाचे फुगे, तिरंगा रंगाने सजवलेले घर, शहिदांसाठी दिवा, पणत्या, तिरंगा रंगाने सजवलेले पूजेचे ताट, प्रसाद, फुले रांगोळी या माध्यमातून सजावट करण्यात आलेली आहे. ही सजावट माधुरी अविनाश चिद्रवार यांनी केली असून त्यांना सुप्रिया भावठाणकर, स्नेहा मॅडमवार, चंद्रकला चिद्रवार, मीरा मॅडमवार यांनी मदत केली आहे. देशाच्या वीर जवानांना या आरासीच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले. ही आरास पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी दिसून आली.

बातम्या आणखी आहेत...