आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण:शिकवणीसाठी गेलेल्या 11 वर्षीय मुलीचे अपहरण ; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

माजलगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिकवणीसाठी गेलेल्या एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीस चॉकलेटचे अपहरण करण्यात आले. दरम्यान गुंगीच्या अवस्थेत मुलगी परत आल्यावर मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील एका भागात १६ वर्षीय आणि ११ वर्षीय अशा दोन मुली शाळेत जातात. बारा ते पाच शाळा करून साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान याच भागातील एका शिक्षिकेकडे खासगी शिकवणीसाठी जातात. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता शिकवणी संपल्यावर मोठी मुलगी (वय १६वर्षे) शिक्षिकेजवळ थांबली तर ११ वर्षीय मुलगी रस्त्यावर येऊन बहिणीची वाट बघत थांबली.यावेळी बाजूलाच उभा असणाऱ्या दोन व्यक्तींनी तिला चॉकलेट दिले.त्यानंतर काही वेळाने ती मुलगी परत याच परिसरातील कापड दुकानाजवळ गुंगी आलेल्या अवस्थेत उभी दिसली. त्यावेळी शोधा शोध करून आलेल्या मोठ्या बहिणीने तिला कुठे गेली होतीस म्हणून विचारले. परंतु अज्ञातांनी दिलेले चॉकलेट खाल्ल्यानंतर पुढे काय झाले हे त्या मुलीस सांगता येत नव्हते. हा सर्व प्रकार मुलीने आईला सांगितल्यानंतर शहर पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...