आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्याला सोडून दुसऱ्या मुलीशी लग्न करत असलेल्या प्रियकराचे लग्न मोडावे यासाठी प्रेयसीने आपल्या मैत्रिणीला सोबत घेत प्रियकराच्या नात्यातील दीड वर्षीय बालकाच्या अपहरणाचा कट रचत अपहरण केले. संभाजीनगर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल होताच पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत तीन तासांत दोन्ही मुलीसह ताब्यात घेऊन तीन वर्षीय बालकाची सुटका केली. ही घटना ही प्रेमप्रकरणातून घडली असून प्रेयसी व तिच्या मैत्रीणीने हा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे.
म्हणून प्रेयसीने रचना अपहरणाचा कट..
त्यात प्रियकराचे लग्न गुरुवार २५ रोजी परळी येथे होते. लग्न घरी शिवाजीनगर येथे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम चालू होता. या लग्नानिमित्त आलेल्या नातलगांच्या मुलापैकी एका मुलाचे अपहरण करण्याचा कट त्या प्रेयसीने रचला. मला सोडून इतर मुलीशी लग्न करतोय म्हणून प्रेयसीने आपल्या मैत्रिणीच्या मदतीने कट रचला.
चॉकलेट दिले अन् ऑटोत पसार केले
नातेवाइकांचा लहान मुलास चॉकलेट देऊन त्यास ॲटोमध्ये बसवून घेऊन पसार झाली. याबाबत संबंधित बालकाचे वडिल रोहित सावंत यांनी २४ मे रोजी सायंकाळी ७ वाजता संभाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळाजवळ सीसीटीव्ही नसल्याने इतर ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले. आरोपीची ओळख पटल्यानंतर मोबाइल नंबरचा शोध घेऊन लोकेशनचा शोध घेतला असता लोकेशन गंगाखेड येथे व तेथून वैद्यनाथ मंदिराजवळ सापडल्यानंतर त्या बालकासह दोन्ही मुलींना ताब्यात घेतले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.