आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण:वडवणीच्या बाजारातून ऊसतोड मजुराचे अपहरण; पोलिसांत गुन्हा दाखल

वडवणीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील बुधवारच्या आठवडी बाजारातून उचलीच्या पैशाच्या वादातून ऊसतोड कामगाराचे कारमधून तीन जणांनी अपहरण केल्याची घटना घडली असून ऊसतोड कामगाराच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून वडवणी पोलिसांत तिघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडवणी शहरात बुधवार १ जून २०२२ रोजी आठवडी बाजारात दुपारी एक वाजता ऊसतोड कामगार रामचंद्र लिंबुळे (रा. लोहा, जि. नांदेड) व पत्नी रेणुका लिंबुळे हे दोघे बाजार करत असताना बाजारात बालाजी महादेव काळे व इतर दोन अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी उचलीच्या पैशावरून रामचंद्र लिंबुळे यांना कारमध्ये घेऊन गेले. म्हणून कामगाराची पत्नी रेणुका लिंबुळे यांनी वडवणी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडवणी येथील शंकर चव्हाण या व्यक्तीचेही सदरील आरोपीने अपहरण केले असून शंकर चव्हाण यांचा मुलगा संपत चव्हाण (रा. वडवणी) यांच्या तक्रारीवरून बालाजी महादेव काळे यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास माजलगावचे पोलिस उपअधीक्षक जायभाये करत असून आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

आरोपींकडून मारहाण, व्हिडिओ व्हायरल
वडवणीच्या आठवडी बाजारातून उचलीच्या पैशाचा वाद करून आरोपी महादेव काळे याने लोहा येथील रामचंद्र लिंबुळे या व्यक्तीला व शंकर चव्हाण यांना अपहरण करून नेले आणि शनिवारी या दोन्ही व्यक्तींना आरोपी मारहाण करत आहे असा व्हिडिओ तयार केला आणि तो व्हायरल करण्यात आला आहे. यामुळे आणखीन वाद चिघळण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...