आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:क्षमता, नेतृत्वगुणांचा‎ विकास होतो: डॉ. सारडा‎

बीड‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खेळ असो वा शिक्षण यात यश‎ मिळवायचे असेल तर विद्यार्थ्यांच्या‎ अंगी शिस्त, जिद्द, प्रामाणिकपणा,‎ संयम, चिकाटी हे गुण असणे‎ आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी‎ जास्तीत जास्त स्पर्धा किंवा खेळ‎ यात सहभाग नोंदविला पाहिजे.‎ आपल्यातील क्षमता, नेतृत्वगुण‎ यांचा विकास याद्वारे होतो, असे‎ प्रतिपादन डॉ.आदिती सारडा यांनी‎ केले.‎ प्रियदर्शनी प्राथमिक विद्यालय व‎ राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय बीड‎ येथे वार्षिक बक्षिस वितरण समारंभ‎ पार पडले. या कार्यक्रमाच्या‎ अध्यक्षस्थानी प्राचार्य‎ आर.बी.चौधरी होते तर प्रमुख‎ अतिथी म्हणून ए.आय.पाटील,‎ व्ही.पी.जाधव हे हजर होते.

याप्रसंगी‎ डॉ.सारडा या बोलत होत्या. इयत्ता‎ दहावीतील विद्यार्थ्यांनीही मनोगत‎ व्यक्त केले. अध्यक्षीय‎ समारोपप्रसंगी प्राचार्य चौधरी यांनी‎ विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेनिमित्त‎ शुभेच्छा दिल्या. सर्व विद्यार्थ्यांनी‎ परीक्षेसाठी चांगली मेहनत वर्ष भर‎ घेतली आहे. तेव्हा सर्वांनी‎ प्रामाणिकपणे परीक्षेस सामोरे जाऊन‎ यशस्वी व्हावे, असे आवाहन केले.‎ शाळा अंतर्गत घेण्यात आलेल्या‎ मैदानी खेळ, विविध स्पर्धा यांचे‎ बक्षिस वाटप अध्यक्ष, प्रमुख पाहुणे‎ यांच्या हस्ते करण्यात आले.‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ए.बी.येवले‎ यांनी केले तर आभार प्रदर्शन‎ ए.एस.घाटे यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...