आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भपातामुळे मृत्यू:‘त्या’ महिलेचा अंगणवाडी सेविकेच्या घरी गर्भपात; चौघे पोलिसांच्या ताब्यात

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गर्भपातामुळेच ऊसतोड मजूर महिलेचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट झाल्यानंतर बीड ग्रामीण पोलिसांनी तिच्या पतीसह सासू, सासरे व दिरास ताब्यात घेऊन चौकशी केली. या चौकशीत गेवराई तालुक्यातील रानमळा येथील अंगणवाडी सेविकेने तिच्या घरी डॉक्टरांच्या मदतीने सोनोग्राफी करून मजूर महिलेचा गर्भपात केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मंगळवारी रात्री त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक संतोष वाळके यांनी दिली.

बीड तालुक्यातील बक्करवाडी येथील शीतल गणेश गाडे (३०) या ऊसतोड मजूर महिलेस तीन मुली असून ती चौथ्यांदा गर्भवती होती. ५ जून रोजी रक्तस्राव सुरू झाल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु सदरील महिलेचा वाटेतच मृत्यू झाला. दरम्यान, गर्भपाताच्या वेळी गर्भाशयाला इजा होऊन अतिरक्तस्राव झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा शवविच्छेदन अहवाल आला.

अंगणवाडी सेविका ताब्यात
गेवराई तालुक्यातील रानमळा येथील अंगणवाडी सेविकेस दुपारी अडीच वाजता पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले. अंगणवाडी सेविकेच्या घरीच महिलेचा गर्भपात केला असल्याची माहिती समोर येत आहे.

बातम्या आणखी आहेत...