आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दांडी:हिंदीच्या पेपरला 943, जीवशास्त्राला‎ 416 विद्यार्थ्यांची जिल्ह्यात गैरहजरी‎

बीड‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी दहावीच्या हिंदी विषयाच्या‎ पेपरला ९४३ विद्यार्थ्यांनी तर,‎ बारावीच्या जीवशास्त्राच्या पेपरला‎ ४१६ विद्यार्थ्यांची गैरहजेरी होती.‎ जिल्ह्यात दोन्ही पेपरला एकही कॉपी‎ केस नसल्याची माहिती जिल्हा‎ परिषदेच्या माध्यमिक शिक्षण‎ विभागाकडून देण्यात आली.‎ जिल्ह्यात सध्या दहावी आणि‎ बारावी बोर्डाच्या परिक्षा सुरु आहेत.‎ बुधवारी दहावीचा हिंदी विषयाचा‎ पेपर सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत‎ पार पडला. हिंदी विषयासाठी एकूण‎ ३५ हजार८९० विद्यार्थ्यांचे अर्ज होते.‎ या पैकी ३४ हजार ९४७ जणांनी‎ पेपरला हजेरी लावली तर, ९४३‎ विद्यार्थ्यांनी दांडी मारली.

बातम्या आणखी आहेत...