आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा नोंद:अल्पवयीन मुलीवर वडिलांकडून अत्याचार ; नराधम पित्यावर गुन्हा नोंद

बीड10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नात्याला काळीमा फासणारी घटना शिरूर तालुक्यात समोर आली. वडिलांनीच मुलीवर अत्याचार केला. नराधम पित्यावर गुन्हा नोंद करून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. शिरुर तालुक्यातील एका गावात राहणारी १३ वर्षांची अल्पवयीन मुलगी अंगणातील बाजेवर झोपली होती. यावेळी नराधम बापाने तिला खाली झोपायला सांगित अत्याचार केला. पीडित मुलीनं आरडाओरडा केल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या आईला जाग आली. त्यानंतर आईलाही देखील बापानं जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित मुलगी ही आठवीत शिकते. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन शिरुर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद केला गेला.आरोपी बापालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...