आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायवतमाळ जिल्ह्यातील ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीस ट्रक मालकाने केज तालुक्यातील डोका गावी पळवून आणून तिला मारहाण करत अत्याचार केला. या त्रासाला कंटाळन मुलीने गुरुवारी ४ रोजी विहिरीत उडी मारली. गंभीर अवस्थेत तिला उपचारासाठी घेऊन जात असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात ठिय्या केल्यानंतर पोलिसांनी ट्रकमालक सुशील भांगे याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, बलात्कार, पोस्को कायद्यानुसार केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
दरम्यान, तिसऱ्या दिवशी मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर केज येथे मुलीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार के ले. यवतमाळ जिल्ह्यातील एक ऊसतोड मजुराचे कुटुंब कर्नाटक राज्यात साखर कारखान्यावर गेले होते. सदरील कारखान्याच्या गळीत हंगाम पूर्ण होताच दुसऱ्या कारखान्यास जाण्यासाठी वेळ असल्याने ट्रकमालक सुशील संपत भांगे (रा. डोका, ता. केज) याने कुटुंबास स्वत:च्या गावी सोयाबीन काढणीस नेले.
डिसेंबर २०२२ मध्ये सुशील भांगे याने अल्पवयीन मुलीस दुसऱ्या कारखान्यावर तिच्या मोठ्या बहीण व मेहुण्यासोबत न पाठवता डोका येथे गावी ठेवले. तेव्हा आई-वडील हे स्थानिक पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले तेव्हा पोलिसांनी तुमची मुलगी ज्या ठाण्याच्या हद्दीत आहे त्या ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले.
मुलीने आईला फोनवरून दिली होती माहिती
दरम्यान, मुलीने आईला फोन करून सुशील हा मारहाण करून अत्याचार करत असल्याचे सांगितले. आई-वडिलांनी मुलीला डोका गावातून घेऊन तिच्या मोठ्या बहिणीकडे सोडले. त्यांनतर भांगेने पाच दिवसांतच मुलीला डोका गावात आणून पुन्हा मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.