आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गरोदर महिलेवर अत्याचार:बीड-नगर मार्गावर नांदूर फाटा परिसरातील घटना; आरोपी फरार, शोध सुरू

पाटोदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दोन विवाहित बहिणीपैकी एका ३ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर अत्याचार केल्याची घटना नांदूरफाटा ते अंमळनेर रोड दरम्यान मंगळवारी (१३ डिसेंबर) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. अंमळनेर पोलिस ठाण्यात पीडित महिलेच्या फिर्यादीवरून गुरुवारी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पाटोदा तालुक्यातील पारनेर परीसरातील गावात आपल्या आईला भेटण्यासाठी शेवगाव व धिर्डी येथून २ विवाहीत बहिणी आल्या होत्या. मंगळवारी रात्री आईला भेटून दोघी शेवगावला जाण्यासाठी निघाल्या. डोंगरकिन्ही मार्गावर नांदुरफाटा येथे वाहनांची वाट पहात थांबल्या असता एका वाहन थांबले. तुम्हाला शेवगावला सोडतो म्हणून चालकाने दोघींना वाहनात बसवले. यावेळी गाडीत पूर्वीच तिघे बसलेले होते. थोडे पुढे गेल्यानंतर त्यातील एकाने दोन्ही बहिणी पैकी २५ वर्षीय ३ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर दोघींना रस्त्यावर सोडून तिघे फरार झाले.

यादरम्यान, पीडितेने अंमळनेर पोलिसांना फोन करून आपबिती सांगितली. पोलिसांनी लागलीच पीडितेने सांगितलेल्या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर पिडीत महिलेला अंमळनेर आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आणले. पुढील वैद्यकीय चाचणीसाठी पिडीतेस बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी शिवा मगर, काळू मगर आणि मन्या नावाचा त्यांचा सहकारी(सर्व रा. शेवगाव) अशा तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पिंक पथकाच्या पोलिस उपनिरीक्षक राणी सानप यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याची माहीती अंमळनेर पोलीसांनी दिली आहे.

आरोपी फरार, शोध सुरू

पिंक पथक पोलिस उपनिरीक्षक राणी सानप म्हणाल्या की, या प्रकरणातील आरोपी फरार आहेत. एकाने बलात्कार केला आहे तर अन्य दोघांनी मदत केल्याने ते सहआरोपी आहेत. फरारींचा शोध सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...