आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीनवर अत्याचार

दिंद्रुड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिंद्रुड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. तरुणाने एक वर्षापासून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्यावर अत्याचार केला. यातून गरोदर राहून तिने एका बाळाला जन्म दिला आहे. याप्रकरणी पोलिसांना तरुणाला अटक केली असून त्याच्यावर बाललैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

मावशीकडे राहत असलेल्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर मागील एक वर्षापासून तरुणाने अत्याचार केला. यातून ती गर्भवती राहिली. सोमवारी (२९ ऑगस्ट) माजलगाव येथील खासगी रुग्णालयात मुलीची प्रसूती झाली. तेथील डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी पिंक पथकाला याची माहिती दिली.

पिंक पथकातील पोलिस उपनिरीक्षक निशिगंधा खुळे व माया मस्के यांनी चौकशी केली. पीडितेचे वय १८ वर्षे ६ महिने असल्याने या प्रकरणात आरोपी सागर कपिल सोनकांबळे याच्या विरोधात दिंद्रुड पोलिस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत, बलात्कारासह अन्य कलमान्वये गुन्हा नोंद केला असून तरुणाला अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...