आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार‎:सामाजिक कार्यकर्त्याला‎ शिवीगाळ, एसपींकडे तक्रार‎

शिरूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलीस कर्मचाऱ्यांनी जातीवाचक‎ शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक दिल्याची‎ तक्रार आदिवासी पारधी महासंघाचे राज्यसचिव तथा‎ सामाजिक कार्यकर्ते सतिश भोसले यांनी एसपी‎ नंदकुमार ठाकूर यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात‎ भोसले यांनी शनिवारी (ता.१७ डिसेंबर)दुपारी‎ पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल‎ केला असून पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी‎ उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यामार्फत चौकशी‎ करण्यात येणार असल्याचे सांगितले. भोसले यांनी‎ तक्रारीत म्हटले आहे, गावातील एका व्यावसायिकास‎ पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची भेट घेण्यासाठी‎ आणि घडलेल्या प्रकाराची माहिती घेण्यासाठी आपण‎ पोलीस ठाण्यात गेलो. याठिकाणी जोगदंड आणि‎ कानडे नामक पोलीस कर्मचाऱ्यांनी अपमानास्पद‎ वागणूक देत शिवीगाळ केली. याप्रकरणी कारवाईची‎ मागणी भोसले यांनी केली.‎

बातम्या आणखी आहेत...