आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:कारच्या धडकेत 3 ठार, माजलगाव- तेलगाव रोडवर शिंदेवाडी फाट्याजवळ घडला अपघात

माजलगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तीन तरुण जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी रात्री ८.३० वाजता माजलगाव- तेलगाव रोडवर शिंदेवाडी फाट्याजवळ घडला.

लहामेवाडीतील तरुण लक्ष्मण कापसे (३२), नितीन हुलगे (३०) व आण्णासाहेब बळीराम खटके हे तिघे तेलगाव येथील कापूस जिंनिगवर कामावर आहेत. काम आटोपून बुधवारी रात्री ८.३० वाजता तेलगावहून लहामेवाडीकडे परत दुचाकी एमएच २३ पी ६२२३ वरुन येत होते. या दरम्यान त्यांना माजलगाव-तेलगाव रोडवर माजलगावकडून येणाऱ्या कारने (एमएच ०४ एडी १९५४) दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात लहामेवाडी येथील दुचाकीवरील लक्ष्मण कापसे, आण्णासाहेब खटके हे जागीच ठार झाले. तर नितीन हुलगे यास उपचारार्थ माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यास ही डॉक्टरांनी मयत घोषित केले. यातील तीन ही तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने माजलगाव तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

बातम्या आणखी आहेत...