आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेवराई-राक्षसभुवन मार्गावर अपघात:ट्रॅक्टर-पिकअपची धडक; बापलेक जागीच ठार, मुलीसह 3 जण जखमी

गेवराई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जखमींना उपचारार्थ दाखल करण्यासाठी ग्रामस्थांची मदत ​​​​​​​

ऊस वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने समोरून येणाऱ्या पिकअपला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात पिकअपमधील बाप-लेकाचा जागीच मृत्यू, तर मुलीसह अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन मार्गावर बुधवारी रात्री ११ वाजता घडला. या अपघातामुळे राक्षसभुवन गावावर शोककळा पसरली आहे. दुसऱ्या अपघातात बीड तालुक्यातील हिरापूरजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत जरूड येथील तरुण ठार झाला.

गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन मार्गावर बुधवारी रात्री ११ वाजता एक ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर भरधाव निघाले होते. याच वेळी समोरून पिकअप येत होता. या दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात होऊन पिकअपमधील राक्षसभुवन येथील चंद्रशेखर श्यामराज पाठक (३९) व त्यांचा मुलगा आर्यन (१२) हे दोघे भीषण अपघात ठार झाले, तर त्यांची मुलगी मंजिरी चंद्रशेखर पाठक (११) हिच्यासह अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन तिन्ही जखमींना वाहनाबाहेर काढून बीड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

या अपघाताची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. बापलेकाचे मृतदेह ताब्यात घेऊन ते उत्तरीय तपासणीसाठी गुरुवारी सकाळी गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर दोन्ही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. गुरुवारी दुपारी राक्षसभुवन येथे दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी गावात शोककळा पसरली होती.

चार महिन्यांपूर्वीच घेतला होता पिकअप
अपघात मृत झालेले चंद्रशेखर पाठक हे राक्षसभुवन येथे धार्मिक विधीचे पौरोहित्य करत असत. त्यांनी चार महिन्यांपूर्वी पिकअप घेतला होता. बुधवारी रात्री राक्षसभुवन येथून ते स्वतः, मुलगा आर्यन, मुलगी मंजिरी व अन्य दोघे जेवणासाठी राक्षसभुवन गेवराई मार्गाने पिकअपने येत असताना हा अपघात झाला.

हिरापूरजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार
बीड | जरूड येथील बाजीराव सुखदेव काकडे (३६ ) हा तरुण बुधवारी रात्री रिक्षामधून उतरून हिरापूरकडे जात असताना त्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
अपघातात ठार झालेले बापलेक.

बातम्या आणखी आहेत...