आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपूर्द‎:साई सेवा पतसंस्थेकडून अपघाती ‎विमा‎ धनादेश मृताच्या पत्नीकडे सुपूर्द‎

केज4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज शहरातील साई सेवा महिला सहकारी‎ पतसंस्थेने कर्जदाराचा अपघाती मृत्यू झाल्याने विम्याचा‎ दोन लाख रुपयांचा धनादेश मयताच्या पत्नीकडे सुपूर्द‎ केला. त्यामुळे या कुटुंबास आधार मिळाला आहे.‎ साळेगांव येथील काशीनाथ राऊत यांच्या दुचाकीला १८‎ एप्रिल २०२२ रोजी अपघात होऊन मृत्यू झाला होता. ही‎ महिती कळताच पंतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक दत्तात्रय‎ गाढवे यांनी विमा कंपनीकडे पाठपुरावा करून मयताच्या‎ वारसदार पत्नी रत्नमाला काशीनाथ राऊत यांना दोन‎ लाख रुपयांचा विमा मंजुर करुन घेतला.

या विम्याच्या‎ रक्कमेचा धनादेश १० डिसेंबर रोजी पतसंस्थेच्या अध्यक्ष‎ नंदा अंधारे, उपाध्यक्षा विद्या डूबे, संचालिका मनिषा‎ गाढवे, विद्या तपसे यांच्या हस्ते रत्नमाला काशीनाथ‎ राऊत यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी छगन अंधारे,‎ गणेश डूबे, भारत जाधव, दिपक तपसे, नंदकुमार राऊत,‎ शाखा व्यवस्थापक दत्तात्रय गाढवे, रामराजे तपसे,‎ अमोल खैरे, विनायक जाधव, दिनकर राऊत, गौतम‎ बचुटे, महादेव दळवे, रमेश गुळभिले आदींसह‎ नागरिकांची उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...