आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात‎:कर्नाटकातून परतणाऱ्या‎ मजुराचा अपघाती मृत्यू‎

बीड6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎चार महीने कर्नाटक राज्यात ऊस‎ तोडणीचे काम करून गावाकडे‎ ट्रॅक्टर मध्ये बसून निघालेल्या‎ वडवणी तालुक्यातील पिंपरखेड‎ येथील ऊसतोड मजुराचा ट्रॅक्टर‎ वरून पडून मृत्यू झाल्याची घटना‎ सोलाूपर जवळ घडली. संदीपान‎ अर्जुनराव साबळे असे मृत‎ ऊसतोड मजुराचे नाव आहे.‎ वडवणी तालुक्यातील‎ पिंपरखेड येथील रहिवासी‎ असलेले संदीपान अर्जुनराव‎ साबळे(४३) हे ऊसतोड मजूर‎ आपल्या पत्नीसह कर्नाटक‎ राज्यामध्ये मागील चार‎ महिन्यापूर्वी ऊसतोडणीसाठी गेले‎ होते. कारखान्याचे काम‎ संपल्यानंतर ते आपल्या गावाकडे‎ ट्रॅक्टर मध्ये बसून निघाले होते.

‎त्यांचे ट्रॅक्टर सोलापूर जवळ आले‎ असता त्यांच्या ट्रॅक्टरच्या समोर‎ बसलेले संदिपान साबळे हे खाली‎ पडले व जखमी झाले.‎ सोलापूर येथील रुग्णालयामध्ये‎ यांना दाखल करण्यात आले मात्र‎ तेथे त्यांना मृत घोषित करण्यात‎ आले. मृतदेह श्वविच्छेदन‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ करण्यासाठी सोलापुर येथील‎ शासकिय रुग्णालयात ठेवण्यात‎ आला. रात्री उशीरा अंत्यसंस्कार‎ केले गेले. साबळे यांच्या पश्चात‎ पत्नी, एक मुलगा व एक मुलगी,‎ आई- वडील,भाऊ असा परिवार‎ आहे.‎

कुटुंब उघड्यावर‎
संदिपान साबळे हे अत्यंत‎आर्थिकदृष्ट्या‎गरीब कुटुंबातील‎होते, राहायला घर‎नाही. केवळ एक‎एकर जमीनीवर‎या कुटुंबाचा‎उदरनिर्वाह‎ चालतो. शेती पिकत नसल्यामुळे ते‎ यावर्षी कारखान्याला गेले होते.‎ कर्जाचा बोजा फेडावा या उद्देशाने‎ कारखान्याला गेलेल्या संदीपान‎ साबळे यांच्यावर ऊसतोडणी करुन‎ परत येत आसताना चालता बोलता‎ काळाने घाला घातला आणि यात‎ कुंटुब प्रमुख असलेले संदिपान‎ साबळे यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे‎ कुटुंब उघड्यावर पडले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...