आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघाती मृत्यू:कारखान्यावर जाणाऱ्या मजुराचा अपघाती मृत्यू

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कारखान्यावर कामाला जाणाऱ्या मजुराचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री हिरापूर जवळ इटकूर फाट्यावर घडली. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भगवान राम किसन टेकाळे (३६) हे बीड तालुक्यातील नागापूर बुद्रुक येथील रहिवासी आहेत. ते हिरापूर जवळ कारखान्यावर कामाला आहेत. शुक्रवारी रात्री ते कारखान्यावर पायी जात असताना महामार्गावर हिरापूर जवळील इटकूर फाट्यावर अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस या वाहन चालकाचा शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...