आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:गडदेवाडी खून प्रकरणतील एका आरोपीची आत्महत्या

अंबाजोगाई2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील गडदेवाडी येथे बाबूराव विठ्ठल गडदे (४५, रा. चिचखंडी, ता. अंबाजोगाई) यांच्या डोक्यात दगड घालून व गमजाने गळा आवळून खून केल्याची घटना १० मार्च उघडकीस आली होती. या प्रकरणात दोन आरोपींविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महादेव गडदे व रामचंद्र गडदे (दोघेही रा. गडदेवाडी, ता. अंबाजोगाई) अशी आरोपींची नावे आहेत. महादेव गडदे (३४) याने पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईच्या भीतीपोटी १३ मार्चला गडदेवाडी येथे शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसरा आरोपी रामचंद्र गडदे (३५) यास १२ मार्च पोलिसांनी अटक करून अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

बाबूराव गडदे हे ९ मार्च रोजी घरातून निघून गेल्याची तक्रार अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांत दाखल झाली होती. त्यानंतर १० मार्च रोजी दुपारी बाबूराव गडदे यांचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी तीन पथके तैनात केली.तर दोन पथके वेगवेगळ्या ठिकाणी आरोपीच्या शोधात होती. रामचंद्र गडदे व महादेव गडदे यांच्याविरुद्ध ११ मार्चला ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...