आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बीड:अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, आरोपी आणि पत्नीविरोधात गुन्हा दाखल

परळीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोपीने मुलीवर पुणे व परभणीत 8 दिवसांत 5 वेळा बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला

परळीतून अल्पवयीन मुलगी गायब झाल्याची तक्रार दाखल होताच संभाजीनगर पोलिसांनी मुलीच्या माेबाइल लोकेशनवरून तपास करत बरकतनगर येथील पती-पत्नीसह अल्पवयीन मुलीस ताब्यात घेतले. दरम्यान, सदरील पुरूषाने लग्नाचे आमिष दाखवत मुलीवर पुणे व परभणीत ८ दिवसांत ५ वेळा बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संभाजीनगर पोलिसात दोघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.

परळी शहरातील बरकतनगरातील अल्पवयीन मुलगी १ जुलै रोजी गायब झाली होती. गुरुवारी मुलीच्या वडिलांनी संभाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी या मुलीच्या शोधासाठी पाेलिस नाईक विलास देशमुख, शत्रुघ्न शिंदे, महिला पोलिस ढोकणे यांचे पथक तयार केले. पथकाने सदरील मुलीच्या मोबाईल लोकेशनवरून ती परभणी येथे असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, ८ जुलै रोजी पोलिसांनी यातील आरोपी नसिर पाशा पठाण, त्याची पत्नी व पीडित मुलीस पोलिसांनी परभणी येथून ताब्यात घेऊन परळी येथे आणले. आरोपींना पीडित मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पुणे व परभणी येथे पाच वेळा बलात्कार केला. या प्रकरणी नसीर पाशा पठाण (३९) व त्याची पत्नी या दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0