आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोणताही अभ्यास करत असताना योग्य दिशा ठरवून व वेळेचे नियोजन करून परिश्रम केल्यास हमखास यश मिळते सध्याचा स्पर्धात्मक काळ बघता सर्व विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषा आत्मसात व्हावी याकरिता दिले गेलेले शैक्षणिक साहित्य व पुस्तक हे विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयोगी ठरतील असा विश्वास युवा नेते जयदत्त धस यांनी व्यक्त केला.
पाटोदा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संघाचे अध्यक्ष सोमीनाथ कोल्हे, तुकाराम येवले यांच्या पुढाकारातून शालेय विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषेच्या पुस्तकांसह शैक्षणिक साहित्य तसेच ५३ दिव्यांगांना ड्रेस व साड्यांचे वाटप व रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला, माजी जि. प. सभापती महेंद्र गर्जे, गटनेते बळीराम पोटे, उपनगराध्यक्ष शरद बामदळे यांच्यासह नगरसेवक सभापती व मान्यवरांची उपस्थिती होती. प्रास्ताविक करताना सोमीनाथ कोल्हे यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली.
धस म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर कठोर मेहनत व अभ्यास याला पर्याय नाही अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी याचा निश्चितच चांगला उपयोग होणार आहे. दिव्यांग बांधव हे आपले महत्त्वाचे घटक असून बांधवांसाठी सरकारने देखील विविध योजनांच्या माध्यमातून या घटकाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम केले आहे.
रक्तदानाचे महत्त्व हे कोविड काळात सर्वांनाच समजले असे धस म्हणाले. माजी जिल्हा परिषद सय्यद अब्दुल्ला, नगरसेवक महादेव जाधव, सुशील कोठेकर, दर्शन कांकरिया, बळीराम पोटे, एल आर जाधव, रामेश्वर गोरे, महेश बेदरे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुरेखा खेडकर यांनी केले.कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.