आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:खामगाव येथे वाळू माफियांवर कारवाई; 3 कोटींचा मुद्देमाल जप्त

बीड2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

खामगाव (ता. गेवराई) परिसरात बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी आपल्या पथकासह गोदापात्रात छापा मारला. या कारवाईत अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनांसह जवळपास तीन कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.

खामगाव आणि इतर भागात हजारो ब्रास वाळूचा अवैध उपसा करून तस्करी करीत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक कुमावतांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास गेवराई तालुक्यातील खामगाव गोदापात्रात शिवारात पथकासह छापा मारला. या कारवाईत तीन हायवा, एक मोठा ट्रक, एक छाेटा टेम्पो, वाळू उपशासाठीच्या केन्या असा मिळून जवळपास तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त वाहने गेवराई बसस्थानक आगारात लावले आहेत. कारवाईदरम्यान रोटर पळवण्यात वाळू माफियांनी यश आले. उशिरापर्यंत या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

पथकाच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न : या कारवाईवेळी पथकातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाळू माफियांनी ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत इतर सहकऱ्यांनी त्यांना बाजूला केल्याने त्यांचा जीव वाचला. याप्रकरणी पोलिस कर्मचारी बालाजी दराडेंच्या तक्रारीवरून सचिन उर्फ गजुअंकल गणपत सोळुंके व पप्पू नबाजी गात, अनिल उर्फ अण्णा संजय सोळुंके (सर्व रा. गोंदी, ता. अंबड, जि. जालना) यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला.

बातम्या आणखी आहेत...