आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

27 वाहने जप्त:8 महिन्यांत अवैध वाळू वाहतुकीच्या 109 वाहनांवर कारवाई

रवी उबाळे | बीड6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यामध्ये अवैध पध्दतीने वाळू उत्खनन करुन वाहतुकीवर नियंत्रण मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तालुकास्तरावर पाेलिस व महसूल यंत्रणेचे संयुक्त पथक कार्यरत असते. मार्च २०२२ ते आॅक्टाेबर २०२२ अखेरपर्यंत एकूणच आठ महिन्यांमध्ये जिल्हाभरातील पाच उपविभागात १०९ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून २७ वाहने जप्त करण्यात आली आहे. एकूण एक काेटी ५८ लाख ६४ हजार रुपयांचा दंड हा जिल्हा प्रशासनाकडून अकारण्यात आला आहे त्यापैकी ४३ लाख रुपयांची दंड रक्कम वसुली रखडली आहे.

जिल्ह्यामध्ये सर्वाधीक अवैध वाळू उत्खनन व वाहतूकीवर कारवाईची संख्या ही बीड उपविभागात ४७ अशी झालेली आहे. यात बीड, गेवराई आणि शिरुर कासार तालुक्याचा समावेश आहे. त्यांनतर माजलगाव उपविभागात ३७ वाहनांवर कारवाई करण्यातआली आहे. या उपविभागात माजलगाव, किल्ले धारुर आणि वडवणी या तीन तालुक्यांचा समावेश आहे. अंबाजाेगाई उपविभागात १२ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून यात अंबाजाेगाई व परळी या दाेन तालुक्यांचा समावेश आहे. सर्वात कमी कारवाईची संख्याही सात ही पाटाेदा उपविभागात झालेली आहे. यात आष्टी व पाटाेदा या दाेन तालुक्यांचा समावेश आहे.

परळी उपविभागात सहा वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. एकूण जिल्हाभरात महसूल आणि पाेलिस यंत्रणेच्या संयुक्त पथकाकडून अवैध वाहतूक वाहनांवर कारवाईसाठी पथक कार्यरत असून त्यांच्याकडून दंड वसुलीची रक्कम अद्यापपर्यंत अपूर्ण राहिलेली आहे. विशेषत: कारवाईनंतर वाहनेही यंत्रणांकडून जप्त करण्यात आलेली आहेत. परंतु वाहतूक करणाऱ्यांवर संपूर्ण नियंत्रण प्राप्त झालेले नाही ही शाेकांतीका आहे.

२७ वाहने जप्त; दंड रक्कम रखडली
जिल्ह्यामध्ये आठ महिन्यात १०९ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी २४ वाहने हे पथकांकडून जप्त करण्यात आलेली आहे. त्यात बीड तालुक्यात एक, गेवराई तालुक्यात दाेन, माजलगाव तालुक्यात २१ असे एकूण २७ वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. एकूण आठ महिन्यामधील कारवाई दंड रक्कम पैकी ४३ लाख ४३ हजार रुपयांची दंड रक्कम ही वसुली प्रलंबीत असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...