आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:प्रभारी सीईओ सोळंकेंच्या संकल्पनेतून उपक्रम; जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शनिवारी पालक मेळावा

बीडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी (२५ जून) जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि पालक यांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये नव्या शैक्षणिक वर्षाच्या अनुषंगाने संवाद साधला जाणार आहे. जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जाणार आहे.

नवीन शैक्षणिक वर्षाला नुकतीच सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात शैक्षणिक सत्र विस्कळीत झाले होते. यंदा पूर्ण क्षमतेने शाळा सुरू झाल्या आहेत. नव्या शैक्षणिक वर्षात शाळांमध्ये राबवले जाणारे उपक्रम, विद्यार्थ्यांची उपस्थिती, अभ्यासपूरक सृजनशील उपक्रम, लोकसहभागातून शाळांमधील भौतिक सुविधांची उभारणी, जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक शाळेला पाणीपुरवठा, वृक्षारोपण, सेतू अभ्यासक्रम याबाबत माहिती देण्यासाठी आणि शिक्षक, पालक यांच्यात संवाद व्हावा यासाठी शनिवारी सर्व शाळांमध्ये पालक मेळावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत सीईओ सोळंके यांनी पत्र पाठवले आहे. पंचायत समिती स्तरावरूनही या पालक मेळाव्यांना अधिकारी भेटी देणार आहेत, असे सीईओ सोळंके यांनी सांगितले.