आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिकन्या:अभिनेत्री डॉली घोक्षे यांचा देवदत्त फिल्म्सच्या वतीने विशेष सन्मान

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्याच्या भूमिकन्या अभिनेत्री डॉली घोक्षे यांना नाटक, मालिका आणि चित्रपट अभिनयातील योगदानासाठी देवदत्त फिल्म्सने सन्मानित केले आहे.औरंगाबाद येथील मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात स्वातंत्र्यदिनी संपन्न झालेल्या भव्य समारंभात डॉली घोक्षे यांना सन्मानित करण्यात आले. सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक ‘निखारे’ फेम डॉ. देवदत्त म्हात्रे यांच्या ‘देवदत्त फिल्म्स’ ने हा सन्मान प्रिन्सेस डॉली घोक्षे यांना औरंगाबादचे सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक थोरात यांच्या हस्ते प्रदान केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक प्रा. जी. ए. उगले हे होते तर ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर आणि समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रिन्सेस डॉली घोक्षे यांनी असंख्य नाटके आणि मालिका यांमधून आव्हानात्मक भूमिकांद्वारे कसदार अभिनय केला आहे. आपले वडिल नाटककार - अभिनेते प्रा. बापू घोक्षे यांचे बोट धरून मराठवाड्याच्या रंगभूमीवरच आपण प्रथम चालायला शिकलो असून या मातीने दिलेले प्रेम आपण कदापि विसरू शकणार नसल्याची कृतज्ञताही प्रिन्सेस डॉली यांनी व्यक्त केली. त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन होत आहे.

बातम्या आणखी आहेत...